मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच दोन ठिकाणी साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्धापन दिनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरही कडाडून टिका केली. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना पलटवार केला आहे.
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
देवेंद्र फडणवीस यांनी जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पुर्ण ऐकलेच नाही. असो. आता ऐका. याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला. म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींनी कोवीड लस तयार केल्याची एक क्लिप सभागृहात ऐकून दाखवली. त्यावर ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हास्त्र जत्रेचा प्रयोग केला. तो व्हिडीओ माझ्याकडे आहे. कोविडची लस मोदीजींनी शोधून काढली मग बाकीचे संशोधक गवत उपटत बसले होते का? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिंग द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रूग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे. सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता तापली आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
मणिपुरमध्ये तुमच्या सुर्याचा प्रकाश का पडत नाही. तिथे का उगवत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सुर्यावर थुकू नका या टिकेवर केला. सीरीया आणि लिबीयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती मला लेप्टनंट जनरल निशिकांत यांनी दिली. सिरीयाचा हुकूमशाहाचा शेवटी काय परिस्थिती झाली ती सर्वांना माहिती आहे. मग तिथे भाजपवाले असले तरीही मारले जाऊ नये हे आमचं हिंदुत्व आहे. अशीही टिका त्यांनी केली.
अर्धवटराव,
मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका…
याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला …
म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला ! #अर्धवटराव #akola #speech #vaccine #Narendramodi #vaccines pic.twitter.com/IynaLKRcZI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटात गेलेल्या आमदार ‘मनिषा कायंदें’वर अपात्रतेची टांगती तलवार, अपात्रतेची कारवाई होणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ तर ठाकरेंकडून ‘खोके दिवस’ साजरा, शिंदे ‘असं’ देणार प्रत्युत्तर
हेही वाचा…“तुझ्या पोराला दुसऱ्यांदा खासदार होऊ द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार”, निलेश लंकेंनी भाजपच्या मंत्र्यांला डिवचलं
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्रिमंडळातील ‘५’ मंत्र्याची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही”
हेही वाचा…“मोदींनी कोवीडची लस शोधून काढली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?”, ठाकरेंचा फडणवीसांना सवाल