मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एक वर्ष पुर्ण होत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदेंनी भाजपसोबत युती स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातील राजकीय गणितं सगळी बदललीत. यातच आता जर निवडणुका घेतल्या तर कोणाची सत्ता स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री होणार याचा सर्व्हे करण्यात आला आहे. यात पुणे जिल्ह्यातीलही विधानसभांचा आढावा घेण्यात आला आहे.
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
पुणे शहरासह जिल्ह्यातील कोथरूड, पर्वती, पुणे कॅटोन्मेंट, शिवाजीनगर, खडकवासला, चिंचवड, भोसरी, दौंड हे विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. आता आलेल्या न्यूज एरेनाच्या सर्व्हेनुसार शहारातील कसाबपेठ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय होण्याची शक्यता, तर सध्या भाजपकडे असलेले शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणी काॅंग्रेसचा उमेदवार होईल.
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
त्याचबरोबर जिल्ह्यातील आंबेगाव, खेड आळंदी, बारामती, मावळ, पिंपरी, हडपसर या मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार विजयी होणार आहेत. तर वडगाव शेरी, इंदापुर येथे राष्ट्रवादीचा पराभ होऊन भाजपचा विजय होणार आहे. पुरंदर, भोर, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट येथे काॅंग्रेसचा विजय होणार आहे. दरम्यान, कसबापेठ, मतदारसंघात काॅंग्रेसचा पराभव होऊन भाजपचा विजय होणार असल्याचेही सर्व्हेच्या निकालात म्हटले आहे. यातच दौंड, इंदापुर, पिंपरी चिंचवड, वडगाव शेरी, कोथरूड, खडकवासला, पर्वती आणि कसबापेठ या मतदारसंघात भाजप विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
न्यूज अरेने राज्याती विधानसभा निवडणुकीचा सर्वेक्षण केले असून यामध्ये भाजपचा सर्वात जास्त १२३ ते १२९ जागा मिळणाल असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या स्थानी शिंदे गट ५५, राष्ट्रवादी ५५-५६ काॅंग्रेसला ५०-५३ तर शिवसेना उबाठा गटाला १७ ते १९ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर १२ जागा अपक्षांना मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Prediction as on date –
BJP : 123-129
SS : 25
NCP : 55-56
INC : 50-53
SS(UBT) : 17-19
OTH : 12Findings –
➡️ BJP will reach its highest ever tally in Maharashtra.
➡️ No of Others will go up as voting day will approach.
➡️ Eknath Shinde’s Shiv Sena will… pic.twitter.com/zePs0kYqmu
— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?