मुंबई : शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत काम न होत असल्यामुळे शिंदे गटात प्रवेश करत असल्याचंही मनिषा कायंदे यांनी सांगितले. तसेच त्यांनी या सर्वांसाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे कारणीभूत असल्याचं मनिषा कायंदे यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी खासदार राहुल शेवाळे यांचं पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
सुषमा अंधारे यांनी खासदार राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिसेंबर २०२२ मध्ये पाठवलेलं पत्र ट्विट केलं होतं. त्या पत्रात मनिषा कायंदे यांच्याकडून ब्लॅकमेलिंग व धमकी करीता केलेल्या गुंड टोळ्याच्या बाबतीत चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि हेच पत्र सुषमा अंधारे यांनी ट्विट करत कायंदेंवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
राहुल शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित महिलेने स्वीय सहाय्यकाबरोबर महिलेचे दारू पिऊन रंग उधळणे, रात्री २ ते ३ वाजेपर्यंत चालु होते, धारावी स्थित होर्डिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबतही दारू पिणे, तसेच लालबाग येथील १ बीएचके प्लॅटमध्ये टाळे ठोकून ताबा घेणे, किमान ३ वेळा विदेश यात्रा, सोने घेणे, गाडी, ड्रायव्हर, घरखर्च करणे. असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
मनिषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापुर्वी झालेली ४० कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना..? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच नागपुर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं. असंही त्या म्हणाल्या आहेत.
मनीषाताई, तुमची पक्ष सोडण्याची कारणे दोन दिवसापूर्वी झालेली 40 कोटीची फाईल आणि हे राहुल शेवाळे यांनी फडणवीस यांना चौकशीसाठी लिहिलेले पत्र हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आठवतंय ना? नागपूर अधिवेशनाच्या वेळी हे तुम्हीच मला दिलं होतं. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @KayandeDr pic.twitter.com/gpbhTqdIxw
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी