मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच दोन ठिकाणी साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्धापन दिनाच्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरही कडाडून टिका केली.
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
मणिपुरमध्ये तुमच्या सुर्याचा प्रकाश का पडत नाही. तिथे का उगवत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सुर्यावर थुकू नका या टिकेवर केला. सीरीया आणि लिबीयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती मला लेप्टनंट जनरल निशिकांत यांनी दिली. सिरीयाचा हुकूमशाहाचा शेवटी काय परिस्थिती झाली ती सर्वांना माहिती आहे. मग तिथे भाजपवाले असले तरीही मारले जाऊ नये हे आमचं हिंदुत्व आहे. अशीही टिका त्यांनी केली.
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींनी कोवीड लस तयार केल्याची एक क्लिप सभागृहात ऐकून दाखवली. त्यावर ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हास्त्र जत्रेचा प्रयोग केला. तो व्हिडीओ माझ्याकडे आहे. कोविडची लस मोदीजींनी शोधून काढली मग बाकीचे संशोधक गवत उपटत बसले होते का? मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिंग द्यायची सध्या गरज आहे. मानसिक रूग्णांना समीर चौगुले यांच्या दवाखान्यात पाठवले पाहिजे. सगळे अवली आहेत. लवली इथे कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता तापली आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
दरम्यान, काँग्रेस सत्तेत होती. तेव्हा इस्लाम खतरे मे है. असे बोलायचे. आता भाजपवाले सत्तेत आहेत. तर हिंदू खतरे मे है. असे बोलतात याचा अर्थ काय ..? तुम्ही सत्ता चालवायला नालायक ठरलाय. हिंदू आक्रोश करत आहेत. काश्मीर -मध्ये अजूनही हिंदू मारले जात आहेत. देशाचे शत्रू संपवा तुम्ही राजकारणामध्ये शत्रू संपवत निघालेले आहात. लेफ्टनंट जनरल श्री.निशिकांत सिंग यांनी तिथली परिस्थिती ट्विटरवर ट्विट केलेली आहे .हे मी नाही बोलत आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“आजच्या काळातील जगातील सर्वांत मोठा नेता म्हणजे राहुल गांधी”
हेही वाचा…“राहुल शेवाळेंचं ‘ते’ पत्र फडणवीसांना गेलं अन् मनिषा कायंदेंचा गेम झाला”
हेही वाचा…पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकीत राजकीय गणितं बिघडणार, नवा सर्व्हे आला समोर, भाजप, राष्ट्रवादी, काॅंग्रेसलाही बसणार फटका ?
हेही वाचा…“फर्निचर वाली बाई मुळे पहिली विकेट गेली”, सुषमा अंधारेंला मनसेचा अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…मुंडे भाऊ-बहिणीचे राजकारणात पुन्हा सुर जुळले, पंकजा मुंडे अध्यक्षपदी, तर धनंजय मुंडे….