नाशिक : प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अयोध्येत पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून तसेच जगातून अनेक महान व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यातच राज्यात गेल्या काही दिवसापासून राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून ठाकरे शिवसेना गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? यामध्ये मी पडणार नाही कारण हा अभिमान आणि अस्मितेचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांसाठी हा आंदाचा क्षण आहे. राम मंदिराचं लोकार्पण हा पुर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा त्याला राजकीय रंग येऊ नये. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही अयोध्येलाही जाऊ. आता मान-पान पाहण्याची वेळ नाही. ही एक अस्मिता जपण्याची गोष्ट आहे. असे माजी उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
एक आनंदाची बाबही आहे की २२ जानेवारी या दिवशी इतके वर्ष ज्यासाठी संघर्ष करावा लागला होता, जवळपास २५ ते ३० वर्षांनी न्यायालयाने राम मंदिरांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आम्ही २२ जानेवारी नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाणार आहोत. या मंदिराच्या प्रवेशासाठी सानेगुरूजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघर्ष करावा लागला. राम हा माझासुद्धा आहे. सांगण्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता. त्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेणार आहोत. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
२२ जानेवारीला संध्याकाळी ६.३० वाजता काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेणार त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गोदावरी नदीची महाआरती करणार आहोत. प्रभू रामचंद्र पंचवटीत वास्तव्यास होते. त्यांच्या पुजित झालेला तो परिसर आहे. हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही गोदातीरी महाआरतीही घेणार आहोत. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
हेही वाचा…कुख्यात गुंड ”शरद मोहोळ”च्या ह’त्ये’ची चित्तथरारक काहाणी, आतापर्यंत काय काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…मोठी बातमी..! “..म्हणून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची दिली धमकी, “आरोपीला ठाण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…शरद मोहोळ याच्या ह’त्ये’ची’ इनसाईड स्टोरी ; ह’त्ये’चा कट काही वर्षापासून शिजत होता
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग