बारामती : राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर जाणार आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खूप दिवसानंतर अजित पवार बारामतीत दाखल होणार असल्याने कार्यकर्त्यांनी स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच अजित पवार बारामतीत विविध कार्यक्रमांना उपस्थितीत राहणार आहे. त्यानंतर अजित पवार पिंपरी चिंचवड मध्ये जाणार आहेत.
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड महापालिकेत येणार आहेत. एकेकाळीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार येणार असल्याने शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जंगी स्वागत केल जाणार आहे. पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ली मानला जात आहे. यामध्ये अजित पवारांना मानला जाणारा मोठा गट आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
सत्तांतरानंतर पिंपरी चिंचवडमध्ये येऊन अजित पवार काय बोलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबईवरून ते सकाळी ९ वाजता पिंपरी चिंचवडचं प्रवेशद्वार म्हणजे मुकाई चौकात पोहचतील. तिथून ते महापालिका दरम्यान त्यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मग सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा दरम्यान पालिकेत आढावा बैठक घेतली जाणार आहे.
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
दरम्यान, बारामती हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. मागील अनेक वर्षापासून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत आहे. यातच आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही अजित पवार बारामतीत फिरकले नाहीत. यातच आता त्यांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोल्हापुरात जाऊन रोहित पवारांचा मुश्रीफांवर निशाणा, लावले गंभीर आरोप
हेही वाचा…“राष्ट्रवादीत कोणतीही फुट नाही,” – सुप्रिया सुळे, तर मग एक गट सत्तेत दुसरा विरोधात कसा ?
हेही वाचा…“मनु आजोबा ‘चंद्रावर तिरंगा’ फडकला, लई वाईट वाटलं असलं बघा”, अजित पवार गटाच्या आमदाराची भिडेंवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरण, शिंदे गटाच्या आमदारांंचं ६ हजार पानी लेखी उत्तर, उत्तारात दडलंय काय ?
हेही वाचा…भुजबळ झाले, मुंडे झाले, आता मुश्रीफ, शरद पवारांचा हुंकार कोल्हापुरात गुंजणार