कोल्हापूर : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या साहेबांचा संदेश या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेकांचा विरोध डावलून मुश्रीफांना संधी दिली पण आता त्यांचेच कार्यकर्ते अडचणी निर्माण करतांना दिसत आहेत. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“राज्यात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष, काका शरद पवार गटात तर पुतण्या अजित पवार गटात दाखल”
१९९८ मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देऊ नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता MIDC मध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. तशा तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या. आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे. अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत. त्यामुळे तरूणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…तब्बल ७ वर्षानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक, अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार”
दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करवीर नगरीत गर्जना होणार आहे. विकसनशील महाराष्ट्राचा निर्धार होणार आहे. पवार साहेबांच्या साथीने पुरोगामी महाराष्टारच्या विचारशील लढ्याला साथ देण्यासाठी शुक्रवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता, शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, कोल्हापुर येथे शरद पवारांची सभा आयोजित करण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीत कोणतीही फुट नाही,” – सुप्रिया सुळे, तर मग एक गट सत्तेत दुसरा विरोधात कसा ?
हेही वाचा…“मनु आजोबा ‘चंद्रावर तिरंगा’ फडकला, लई वाईट वाटलं असलं बघा”, अजित पवार गटाच्या आमदाराची भिडेंवर जहरी टिका
हेही वाचा…शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरण, शिंदे गटाच्या आमदारांंचं ६ हजार पानी लेखी उत्तर, उत्तारात दडलंय काय ?
हेही वाचा…भुजबळ झाले, मुंडे झाले, आता मुश्रीफ, शरद पवारांचा हुंकार कोल्हापुरात गुंजणार
हेही वाचा…महाविकास आघाडी इंडिया बैठकीसाठी सज्ज, बैठकीपुर्वी पत्रकार परिषद होणार