मुंबई : मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महापालिकेला दर्जा आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत मुंबई महापालिकेला लुबाडून खाण्याचे काम काही अधिकाऱ्यांकडून सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अर्जुन नागराळे नावाच्या एका शिपायाने पत्नीच्या नावाने एक बेनामी कंपनी खोलली आणि त्यावर कोट्यवधींची कामे केली. एक सहआयुक्त आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावर एक कंपनी खोलली आणि कोट्यवधींची कामे करून बिले लाटली. मुंबईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे.
नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदीजींबद्दल तोंड सांभाळून बोला – चंद्रकांत पाटील
अजमेरा बिल्डर्स कडून तर काय चाललंय हे मला कळतंच नाहीये. शासनाचा भूखंड शासनाच्या माथी मारण्याचे काम अजमेरा बिल्डर्सकडून सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेने एप्रिल २०२०मध्ये एक निर्णय घेतला ज्याद्वारे १०७ भ्रष्ट कर्मचारी कामावर घेतले. कोविडच्या काळात घेतलं तर ठीक आहे मात्र हे कर्मचारी आरोग्य विभागातील नव्हते.
चंद्रकांत पाटलांचे ‘युती’चे संकेत अन् महेश लांडगेंची शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी!
ज्युनिअर इंजिनिअर घेतले,वेगवेगळ्या विभागातील लोकं त्यांनी कामावर घेतले. १०७ भ्रष्ट अधिकारी जर तुम्ही एका दिवसात घेत असाल तर भ्रष्टाचार का होणार नाही ? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे. ४० ४०% बिलो जाऊन रस्त्यांची २, ३ हजार कोटी रुपयांची कामे घेतली जात आहेत. यामुळे कोणत्याही रस्त्यांची कामे ही चांगली होणार नाहीत मी तर म्हणतो होऊच शकत नाही. मी या भ्रष्टाचारांबद्दल संपूर्ण माहिती काही दिवसांमध्ये प्रदर्शित करणार आहे. बिल बनत असताना बिलांमध्ये अफरातफर करून सगळं मॅनेज करून हे सर्व सुरु आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.
नवीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा; आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
रोडच्या कामांमध्ये मागील काळात ज्या ठेकेदारांनी, कॉन्ट्रॅक्टदारांनी भ्रष्टाचार केला होता आणि त्यांना पालिकेकडून ब्लॅक लिस्ट करण्यात आलं होतं त्यांना एका दिवसामध्ये पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरु असणाऱ्या या भ्रष्टाचाराला नगरविकास मंत्री थांबवणार का ? असा संतप्त सवालही फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
Read also:
- आता मंत्र्यालयाचा नवीन पत्ता ‘शिवतीर्थ’ आहे याची नोंद घ्या; संदीप देशपांडेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
- परदेशातून आलेल्या नागरिकांची पुणे विमानतळावर होणार आरटीपीसीआर चाचणी.!*
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण
- बेनकेंसोबत झालेल्या राड्यावर सोनवणे स्पष्टच बोलले; महाविकास आघाडीत शिवसेनेला अपमानित केलं जातयं
- आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी