पुणे : मागील काही महिन्यापासून पुण्यात राजकीय नेत्यांकडून खंडणी मागण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्याइतर नेत्यांकडून खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे. यातच आता काॅंग्रेसचे माजी नगरसेवक अविनाथ भागवे यांना देखील फोनवरून खंडणी मागितली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुण्यात आता एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
अविनाथ भागवे यांनी याप्रकरणात आता समर्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अविनाथ भागवे हे काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश भागवे यांचे पुत्र आहेत. अविनाथ भागवे यांना व्हासट्अप मॅसेज द्वारा धमकी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून 30 लाखांची खंडणी मागितली, नाही तर गोळ्या घालून ठार केलं जाईल अशा प्रकाराची धमकी देण्यात आली आहे.
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
दरम्यान, अविनाथ भागवे यांनी याप्रकरणानंतर लगेचच गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी आता पोलीस करीत असून आतापर्यंत चौकशीतून काहीच बाहेर आलं नाही. परंतु भाजप नेत्यांसह आता काॅंग्रेसच्या नेत्यांनाही अशा प्रकारची धमकी येत असल्याने पुण्यात राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
Read also
हेही वाचा…“तुमच्या घरात एक बाई घुसली आणि तुमच्याच पत्नीवर..”, सुषमा अंधारे फडणवीसांवर काय बोलून गेली ?
हेही वाचा…“तुमच्या टांगा सांभाळा, तुमची जीभ चुरू चुरू चालतेय,” संजय राऊतांचा बावनकुळेंना इशारा
हेही वाचा…“..त्यामुळे मी राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो,” नितीन गडकरींचं राहुल गांधीबाबत मोठं विधान
हेही वाचा…“शिवसेनाप्रमाणे काॅंग्रेसमध्येही तोच शिरस्ता,” राहुल गांधी आम्हाला वेळ देत नाही, काॅंग्रेसच्या नेत्यांची खंत
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल