मुंबई : राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसह अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. यातच आता सुनील तटकरे यांच्यासह, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते लवकरात लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्त्ये अतुल लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा…दोन्ही पवारांना बारामतीत पाडणार, शिंदेंच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅंलेज
अतुल लोंढे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार. असा टोलाही लोंढे यांनी लगावलाय.
हेही वाचा…“मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा पूर वाहिला, पण मंत्र्यांनी नाही पाहिला”
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच जागावाटपाबाबत महायुतीत अजूनही सकात्मक चर्चा झालेली नाहीय. यातच अजित पवार गटाला महायुतीत फक्त तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उरर्वित उमेदवारांना भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता लोंढे यांनी मोठा दावा केलाय.
धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा
ने ठगा नहीसुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या…
— Atul Londhe Patil (@atullondhe) March 11, 2024
READ ALSO :
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
हेही वाचा…“लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय”, शरद पवार गटात पक्ष प्रवेशावर अजित पवार गटाची प्रतिक्रिया
हेही वाचा..शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
हेही वाचाशिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी