पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधक या दोन्हींमध्ये जोरदार संघर्ष वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे भाजप विरोधात आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या आठवड्यांमध्ये झालेल्या दौऱ्याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही काळे झेंडे दाखवले हे त्याच संघर्षाचे परिणाम आहेत.
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मारहाण; शिवसैनिकांवर गृहमंत्री कारवाई करणार का?
आता पुण्याच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीने भाजपचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि खासदार गिरीश बापट यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार गिरीश बापटांवर हल्ला चढवला आहे. गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ? असा संतप्त प्रश्न काकडेंनी उपस्थित केला आहे.
बीडमध्ये काका-पुतण्या संघर्ष पेटला; क्षीरसागरांनी फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नेते
पुणे महानगरपालिकेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता होती. त्यांच्या सत्तेला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून पुण्याच्या पाणी प्रश्नाबाबत सातत्याने अंधार असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे असा टोलाही अंकुश काकडे यांनी गिरीश बापटांना हाणला आहे.
मुंबै बॅंक निवडणुक प्रकरण: प्रवीण दरेकरांवर अटकेची टांगती तलवार
खासदार गिरीश बापटांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांच्या घराच्या पाण्याची पाहणी केली. मी त्यांना एक विनंती करतो की त्यांनी एकदा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घराची पाहणी करावी जेणेकरून त्यांना लक्षात येईल की पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्तांवर ठेवून काही उपयोग होणार नाही. महापालिकेचा सध्याचा कारभार बघता नक्कीच जनता भाजपला घरी बसवेल असं देखील काकडेंनी म्हटलं आहे.
Read also:
- पंतप्रधानांनीच चित्रपट बघण्याचं आव्हान केलं तर एकवाक्यता टिकणार कशी ? शरद पवार
- निवडणुकसाठी भाजपचा नवा डाव; भाजप करणार ‘चाय पे चर्चा’
- ‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत: च्या आईचे नाव द्यावे, वाईट वाटते; भाजप नेत्याची टीका
- आपण किती खरं बोलतो ते देवाच्या दरबारात तपासून घेतलं पाहिजे :संजय राऊत
- प्रमोद सावंतांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मोदींसह अमित शहा, फडणवीस सोहळ्याला उपस्थित