मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहुर्त लागला आहे. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील 18 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.. मराठवाड्यातून तानाजी सावंत, संदिपान भुमरे, संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांना देखील मुंबईतून फोन आला आणि त्यांची कॅबिनेट म्हणून वर्णी लागली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहुर्त ठरला.. उद्या शपथविधी होणार?
राज्य परीक्षा परिदेअंतर्गत शिक्षकांसाठी बंधनकारक असलेल्या टीईटी 2019 या वर्षीच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. या परिक्षेत जवळपास 7 हजार 850 अपात्र विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊन पास करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव समोर आले आहे. ऐनवेळी टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने त्यांचं मंत्रिपद जाणार अशी चिन्हे दिसत होती मात्र आता अब्दुल सत्तार हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
“अगोदर जहरी टिका त्यानंतर कौतूक”; रोहित पवारांचं मुख्यमंत्र्याबाबत नेमकं चाललंय काय?
औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्यात परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या परीक्षेत जवळपास 7 हजार 850 अपात्र विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊन पास करण्यात आल्याचे आढळले समोर आले आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तर यांच्या कन्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे या यादीत असल्याचे समोर आले आहे.
मंत्रीपद अन् महामंडळासाठी महादेव जानकर आग्रही; शिंदे सरकारमधील मंत्रीपदे अजूनही गुलदस्त्यात
शिंदे गटातील दीपक केसरकर, उद्य सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्ष बच्चू कडू, राजेद्र पाटील येड्रावकर यांना संधी मिळणार असल्याचं बोलले जात आहे. तर भाजप मध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, अशिष शेलार, नितेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे.
Read also
- एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
- औरंगाबादमधील 6 आमदारांनी सो़डली साथ, ठाकरेंकडून आंबादास दानवेंना मोठी जबाबदारी
- “इसलिये में करता रहा काँग्रेस पे वार”; आठवलेंनी सादर केली संसदेत कविता
- “मंत्रिमंडळ विस्ताराचं कोणतंही निमंत्रण आलं नाही”; अजित पवारांचं स्पष्टीकरण
- आजोबा भिजले, नातूही भिजले पण काय उपयोग? ‘त्या’ फोटोवरून खोतांचा रोहित पवारांना टोला