मुंबई – शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिलंय. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं.
सत्तार म्हणाले, “राणे चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी केलं. त्यांचं लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.
“रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
“राणा दाम्पत्य अशी निवडणूक लढणार नाहीत. कारण ते कधी आरक्षणाची गोष्ट करतात, कधी मागासवर्गीयांवर अन्यायाचा मुद्दा उपस्थित करतात. जाती धर्माची नावं घेऊन राजकारण करणं सोपं आहे. राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत. त्याचं उत्तर आम्ही निश्चित देऊ,” असं मत अब्दुल सत्ता यांनी व्यक्त केलं
अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिमंडळात महसूल सारख्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्री केलंय. आता रावसाहेब दानवे यांनी रेल्वे खात्याच्या माध्यमातून दिल्ली सरकारकडून महाराष्ट्रासाठी झुकतं माप द्यावं, मी महसूल मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी जागा कमी पडेल त्या त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देईल.”
Read also:
- एनआयएने दहशतवादी दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; पण नवाब मलिकांचं नाव चर्चेत, दोघं ताब्यात
- संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर नवा आरोप; म्हणाले, किरीट का कमाल.. आप क्रोनोलॉजी समजीए!
- NIA ने दाऊदच्या हस्तकांच्या मुसक्या आवळल्या; अन् सरकार हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना अटक करण्यात व्यस्त
- नवनीत राणा दिल्लीकडे रवाना; केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन तक्रार दाखल करणार
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
- “वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द