मुंबई : गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मुंबई महानगरपालिकेतील अनेक भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणले आहेत. यामध्ये रस्त्यांचा घोटाळा, खडीचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचरचा झालेला घोटाळा असो. या घोटाळ्यांसदर्भात आम्ही राज्यपाल रमेश बैस यांना माहिती दिलेली आहे. मागील काही महिन्यापासून प्रशासक असलेल्या महापालिकेत असे घोटाळे होत आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. असं शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आज आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”
राज्यात सध्या बिल्डर काॅन्टस्ट सरकार बसलं असून रस्त्यात सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. या रस्त्यांच्या निविदाबाबत सगळ्याच पक्षातील नेत्यांनी याबाबत पत्र दिली आहेत. परंतु कुठेच काही कारवाई झालेली दिसत नाही. तसेच खडीच्या घोटाळ्यात सीएमच्या जवळची व्यक्ती या रॅकेटमध्ये आहे. याच एका कंपनीमुळे एक आठवडे काम बंद होती. त्यामुळे आता ही काम सुरू झाली पाहिजे. ती कुठेच सुरू होतांना दिसत नाही. असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका
दरम्यान, काही कामं ही एकाच कंत्राटदाराकडे देण्यात आलेली आहेत. पुढच्या पाच ते सहा वर्षात ही कामं केली जातील असं सांगण्यात आलं आहे. आमची हीच मागणी होती की या सगळ्या घोटाळ्याची यादी आम्ही राज्यपाल महोदयांकडे दिली आहे. यासंदर्भात सगळ्या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केलेली आहे. असंही आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं आहे. तसेच 160 कोटीचं काम 263 कोटींना कंत्राटदारांना देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”