मुंबई : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या खंडणीच्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना या प्रकरणी पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता अनिल देशमुख आणि परमबीरसिंग हे दोन्ही तुरुंगात आहेत आणि चौकशी सुरु आहे.
ठाकरे सरकारने भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड मोडले; भाजप नेते गिरीष महाजनांचा गंभीर आरोप
घोटाळ्यांच्या सर्व प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांचे नाव हे अत्यंत प्रखरतेने समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून ते विरोधी पक्षातील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. मागील काही दिवसांत त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर देखील आरोप केले होते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर आरोप केले आहेत. प्राजक्त तनपुरे यांची नुकतीच सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आता प्राजक्त तनपुरेही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाटेवर असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे सोमय्या यांनी म्हटले. शरद पवार काय करू शकतात हे राज्याच्या जनतेला लवकरच कळेल.
नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!
लाखो कष्टकरी शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घशात घातले आहेत. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटीची संपत्ती असणारा कारखाना अवघ्या १३ कोटी रुपयांमध्ये हस्तांतरित करण्यात आला. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन करण्यात आल्याचा आरोपही यावेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Read Also :
- भाजपला जोड्याने हाणला पाहिजे; राष्ट्रवादी आक्रमक, पुण्यात गिरीष बापटांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
- राष्ट्रवादीच्या कार्यकारणीत अजित पवारांचा विसर; होर्डिंगवरून फोटो गायब
- मी जर उत्तर दिलं तर तुमची प्रकृती बिघडेल; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- संजय राऊत हे एक नंबरचे डबलढोलकी आहेत; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!