मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रताबाबत सादर केलेल्या दोन्ही गटाच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज फेटाळून लावल्या. तसेच या प्रकरणात अध्यक्षांनी कोणालाही अपात्र ठरवले नाही. तसेच विधानसभेत अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे शरद पवार गटानं केलेल्या या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटाचं संख्याबळ विचारत घेऊन मुळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा महत्वाचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यावरून आता विरोधकांनी भाजपसह विधानसभा अध्यक्षांवर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा…पक्ष काढलं, चिन्ह काढलं, तरीही निवडणुक लढवली आणि अन् १०१ जागा मिळवल्या, महाराष्ट्रातही बदल होईल का ?
सगळेच पात्र न्याय मात्र अपात्र भाग २ असं म्हणत कॉंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या राष्ट्रवादीच्या अपात्र प्रकरणाच्याविरोधात जोरदार टिका केली आहे. हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने, लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने. पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण ? असा सवाल करत हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…“..तर नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीला पुर्णविराम लागणार? “
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच. जनता सत्याच्या अर्थात आदरणी शरदचंद्र पवार आणि महाविकास आघआडीच्याच पाठीशी खंबीर उभी राहिल. जनतेच्या कोर्टात गद्दारांना क्षमा नाही. असेही त्या म्हणाल्या.
सगळेच पात्र..न्याय मात्र अपात्र – भाग २
हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने,
लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने…… पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण? हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे… खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच… जनता सत्याच्या अर्थात आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि…
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 15, 2024
READ ALSO :
हेही वाचा…तेव्हा मग दोन वर्ष काय अंडी उबवत होता का ? जितेंद्र आव्हाडांचा राहुल नार्वेकरांना संतापजनक सवाल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण..! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा….गिरीश महाजनांचा फोटो ट्विट, “तेव्हा बसेस फोडल्यात, आता विरोधक फोडताय ?” शरद पवार गटाचा हल्लाबोल
हेही वाचा…राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालाच्या वाचनास सुरूवात, राज्यात आणखी एक मोठी घडमोड
हेही वाचा…“जरांगे पाटलांची तब्येत ढासळली, प्रकृती चिंताजनक..! मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावलं, दिले ‘हे’ आदेश “