IMPIMP
Ajit Pawar marches towards Baramati, preparing to shock Supriya Sule Ajit Pawar marches towards Baramati, preparing to shock Supriya Sule

अजित पवारांनी बारामतीकडे मोर्चा वळवला, सुप्रिया सुळेंना धक्का देण्याच्या तयारीत ?

पुणे :  जिल्ह्याच्या इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री. मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्व, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे,नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळते-जुळते असावे , अशा सूचना करत इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून तो सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी दिले.

हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका 

दरम्यान या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत आश्वस्त केले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, देवस्थाने आणि पर्यटनक्षेत्रांच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ? 

इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल. ही विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. विकासकामे करताना त्या परिसराचा, वास्तूचा ऐतिहासिक, पुरातत्व महत्व जपले जावे, याची काळजी घ्यावी. गढीच्या परिसरात अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्याची कारवाई करण्याची सूचनाही अजित पवारांनी केली.

READ ALSO :

हेही वाचा…“2024 नंतर इंडियातील सर्व पक्ष बेरोजगार होणार”, बड्या नेत्यांनी विरोधकांना डिवचलं 

हेही वाचा…“फडणवीस सरकारचा कणा केंद्र सरकारपुढे वाकला, अन् आता मिंधे सरकारचा कणा मोडून पडला” 

हेही वाचा…विविध नेत्यांच्या नियुक्त्या तर अनेकांचा पक्षप्रवेश..! शरद पवार गटात मोठ्या राजकीय हालचाली सुरूय 

हेही वाचा…“भित्रट नसाल तर लावा निवडणुका”, ठाकरेंच्या वाघांनी भाजपला दिलं ओपन चॅलेंज 

हेही वाचा…इंडियाच्या नेत्यांना बसण्यासाठी ४५ हजारांची खूर्ची, ६५ खोल्या बुक, कोट्यावधीचा खर्च, सगळे पक्ष बेरोजगार होणार