मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपने राहुल गांधींचा आंदोलनातून जाहीर निषेध व्यक्त केला. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”
अंबादास दानवे यांनी याबाबत एक ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आता झाले ना ९ महिने, बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायला निर्णय घेण्यासाठी पण अजूनही सुपर सीएमच लागतात का तुम्हाला ” ? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे..! असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदेंना डिवचलं.
हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका
एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत सहभाग घेतला. या पत्रकार परिषेदत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना स्क्रिप्टवरील मजुकर वाचण्यास विचारतांना दिसत आहेत. काॅंग्रेसने हा व्हिडीओ शेअर करीत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या व्हिडीओ मध्ये एकनाथ शिंदे फडणवीसांना वाचू का असं विचारत आहेत. त्यात वाचण्याची काहीच गरज नाही. असं म्हणतांना देवेंद्र फडणवीस दिसत आहे.
हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ काॅंग्रेसने ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचान न करता मत ठोकून द्यायचं. वाचायची पण परमिशन घ्यावी लागते, मामूंना, आणि चालले राहुल गांधींना शिकवायला. असं म्हणत काॅंग्रेसने शिंदेंवर निशाणा साधलाय.
@mieknathshinde आता झाले ना ९ महिने! बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते इतक्या दिवसात. कागद वाचायचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही ‘सुपर सीएम’च लागतात का तुम्हाला? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला म्हणे! pic.twitter.com/MuwUxmCOwb
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 27, 2023
Read also
-
- हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
- हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल