मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला आज तीन वाजपर्यंत पक्षनाव आणि निवडणुक चिन्ह सादर करण्याचे आदेश दिले होते. आगामी काही दिवसात राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यानिवडणुकीकरीता आयोगाने शरद पवार गटाला यासंदर्भात आदेश दिले आहेत. यातच आता शरद पवार गटाने तीन नाव आणि तीन निवडणुक चिन्ह्यांची नावे पाठवली असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, “स्वत: ला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून उल्लेख करत..,”
शरद पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तीन नाव पाठवली आहेत. निवडणूक आयोगाला शरद पवार यांच्या गटाकडून याबाबत पत्र पाठवण्यात आलं आहे. त्या पत्रात तीन नाव पाठवली गेली असून आयोग त्यातलं एक नाव मान्य करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आयोगाला हे पत्र पाठवण्यात आलं आहे. यातच आता नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरद पवार, आणि नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी- एस अशी नावं पाठवण्यात आली असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. तर चिन्हांसाठी कपबशी, सुर्यफूल, चष्मा, उगवता सुर्य या चिन्हांचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचे कोणीही काका-मामा राजकारणात नव्हते, तेव्हा…,” सुप्रिया सुळे राष्ट्रवादी निकालाच्या विरोधात कडाडल्या
दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस गटाकडून आज शरद पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. फिर हेरा फेरी, हुकूमशाही पद्धतीने पक्ष आणि चिन्ह मिळवलं, असा मजकूर लिहून अजित पवार यांच्यावर टिका करण्यात आली आहे. यातच एक सुर्य, एक चंद्र आणि एकच शरदचंद्र असा मजकूर या फ्लेक्सवर पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड भागात असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“तर आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवू,” महेश लांडगे यांनी दिली इशारा, प्रकरण काय ?
हेही वाचा…“जेव्हा घड्याळ चिन्ह घेतलं तेव्हा मला भीती वाटायची की…”, जंयत पाटील असे काय बोलून गेले ?
हेही वाचामोठी बातमी…! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत नार्वेकरांचा मोठा दावा, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांच्या हातातून राष्ट्रवादी निसटली, दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ वाढला, असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
हेही वाचा…वाह रे पठ्या..! मनसेने राष्ट्रवादीच्या प्रकरणात दारूगोळा भरला, अजित पवारांवर चढवला हल्ला