मुंबई: निवडणुक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात जात आहे. तर प्रशांत किशोर यांनी काँग्रसमध्ये प्रवेश केला तर त्यांना पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून किंवा सरचिटणीस म्हणऊ नेमणुक केली जाऊ शकते.
हे पण वाचा: अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची बैठक झाली. याआधी अनेक वेळा अशा बैठका झाल्या आहेत. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता यामुळे समोर आली आहे.
हे पण वाचा: ११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात
प्रशांत किशोर यांच्याशी १५ जुलै रोजी नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी ए. के. अँटोनी, मल्लिकार्जुन खरगे, कमल नाथ, के. सी. वेणुगोपाल आणि अंबिका सोनी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे सल्लामसलत केली. प्रियांका गांधी यादेखील वरिष्ठ नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करीत आहेत.
हे पण वाचा: “नुकसान मोठं मात्र मिळणारी मदत तोकडी, त्यामुळे बहाणेबाजी बंद करून जबाबदारी घ्या!”
भाजपचा आक्रमकपणा आणि पक्षांतर्गत जी-२३ गटाच्या नेत्यांकडून गंभीर धोक्याला काँग्रेस तोंड देत असताना कोणतेही राजकीय वादळ निर्माण होऊ नये यासाठी सोनिया गांधी यांनी हे पाऊल उचलायच्या आधी खूप काळजी घेतली आहे. प्रशांत किशोर यांनी १५ जुलै रोजीच्या बैठकीत केलेल्या सादरीकरणाने सोनिया गांधी खूप प्रभावित झाल्या. राजकीय विश्लेषकांनी मोदी हे अजिंक्य असल्याचे चित्र रंगवले असले तरी ते तसे नाहीत, असे प्रशांत किशोर यांनी म्हटल्याचे समजते.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!
- मनी लाँड्रिंग प्रकरणी: अनिल देशमुखांच्या संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
- पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘एनटीए’कडून जेईई परीक्षा प्रवेशपत्रे जारी; ३ व ४ ऑगस्ट रोजी होणार परीक्षा
- आजचे क्षण म्हणजे भारावून टाकणारे, आणि ऊर्जा देणारे; पंकजा मुंडे म्हणतात….
- राष्ट्रवादी रिलीफ फंडाच्यावतीने कोकणातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत