मुंबई : महामारीची पहिली लाट देशात आली, तेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनच्या छायेत होता. ती ओसरल्यानंतर सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत झालं. मात्र, महामारीच्या दुसऱ्या लाटेबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनदेखील तयार नव्हतं. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली,” असं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं.
मग तो नक्कीच सर्कशीतील वाघ असणार; नारायण राणे यांची शिवसेनेवर खोचक टीका
तसेच, आता ही लाट ओसरत आहे. त्यामुळे, निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, त्यामुळे वाढलेल्या गर्दीची मात्र आता चिंता वाटत आहे. महामारीची तिसरी लाट कधी येईल, हे सांगता येत नाही. मात्र, सध्याची गर्दी पहिली, तर हीच लाट पुन्हा उलटेल का?, हा मोठा धोका वाटत आहे,” अशी भीती त्यांनी, मालाड मधल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनावेळी व्यक्त केली.
मनसेचा मोठा नेता सायबर क्राईमचा बळी, केले सतर्क राहण्याचे आवाहन
यावर आता, भाजपकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जात असून, भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत, “आता वाटायला लागलंय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे. मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नाही,” असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे.
“होय! मी भक्त आहे! आणि याचा मला अभिमान आहे!”
“महामारीची दुसरी लाट ओसरली नसून, सध्या जरी बेड्स रिकामे दिसत असले, तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून, आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम कटाक्षाने पाळावे लागतील. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे आपण जगभर पाहत आहोत, महामारीची लाट परत उसळत आहे, ते पाहून सावध राहावे लागेल. महामारीच्या दुसऱ्या लाटेतच ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू पसरत आहे. त्याने अजून आपले रंग दाखवले नाहीयेत पण ती राज्यात आहे. त्यामुळे, नागरिकांनी आत्ता गर्दी टाळली नाही, तर हीच लाट उलटण्याची चिन्हे जास्त आहेत,” असं म्हणत वाढत्या गर्दीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.
आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे. मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नाही. https://t.co/uez3e4CHHt
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 29, 2021
Read Also :
- तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल?
- माझं वय झालयं, मी चौकशीला येवू शकत नाही; अनिल देशमुखांचे ED ला पत्र
- पुणे महापालिकेत अजित पवारांचा मनमानी कारभार; महापौर मोहोळांचा बैठकीतून पत्ता कट
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसला आमचा पाठिंबा; शिवसेना राष्ट्रावादी काँग्रेसने केला पुनरुच्चार
- अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा अर्ज दाखल