कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी जय्यत तयारी करतांना दिसत आहे. भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आघाडीने आता मित्र पक्षांना देखील एकत्रित निवडणुका लढवण्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीत आल्यास संभाजीराजेंना उमेदवारी देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“रायगडमध्ये यावेळी मोदींविरोधात त्सुनामी सारखं मतदान होणार”, ठाकरेंनी सुनील तटकरेंना दिलं आव्हान
माजी खासदार संभाजी राजे यांनी अलिकडेच स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. मात्र महाविकास आघाडीतील तीन पैकी एका पक्षात प्रवेश केल्यास संभाजी राजे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. छत्रपती संभाजीराजे हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. शिवसेना, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या पक्षात संभाजीराजेंनी प्रवेश केल्यास लोकसभेला उमेदवारी दिली जाणार आहे. अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…“३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये विकासनिधी,” ठाकरे गटाची जोरदार टिका
कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात सध्या खासदार संजय मांडलिक शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे संभाजी राजे यांनी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापुरातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता संभाजी राजे पुढील काय भूमिका घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ”, सुनील देवधर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
हेही वाचा…“विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प”, केंद्रीय अर्थसंकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“शरद पवार सदस्य नसतील तर मग राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली?” सभागृहात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना ‘त्या’ प्रकरणात पुन्हा क्लीनचीट, रोहित पवार म्हणाले…