पुणे : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय होते. गिरीश बापटांच्या निधनानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली आहे.
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
पुणे पोरकं झालं आहे. भाजप ज्येष्ट नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त खासदार गिरीश बापट यांचं निधन अतिशय दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपाच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. RSS चे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री…अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या. बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे, आमचा मार्गदर्शक हरपला आहे.
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुणे पोरकं झालं…..!
भाजपा ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबतच आम्हा भाजपाच्या परिवारावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. #RSS चे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री… pic.twitter.com/3cxaYFZac5
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 29, 2023
Read also
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?
हेही वाचा…“गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापटांना भावपूर्ण श्रध्दांजली
हेही वाचा…चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट
हेही वाचा“शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून बापटांना भावपुर्ण श्रद्धांजली”,म्हणाले की…,
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास