पुणे : पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट हे कसबा विधानसभा (Kasba VIdhansabha) मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ साली त्यांनी पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘भाऊ’ म्हणून लोकप्रिय होते.
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
गिरीश बापट यांनी आणीबाणीच्या काळात नाशिकच्या जेलमध्ये १९ महिन्यांचा कारावास भोगला. त्यानंतर गिरीश बापट यांच्या राजकीय कारर्किदीला पुण्यातून सुरूवात केली. १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात पुणे पालिकेत नगरसेवकाची निवड झाली. टेल्कोमधील लढवय्या कामगार म्हणून सुरू गिरीश बापट यांची ओळख होती. पुढे पुणे महापलिकेत तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा कसब्यातून आमदार आणि आता लोकसभेचे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द उंचावतच गेली. पुण्याच्या राजकारणात बापटांनी ‘भाऊ’ म्हणून लौकिक मिळविला. विरोधी पक्षातील आणि पक्षांतर्गत आव्हानांना सहजतेने पार करण्याची त्यांनी खासियत होती. आणीबाणीमध्ये नाशिक जेलमध्ये १९ महिन्यांचा कारावास देखील त्यांनी भोगला होता.
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
गिरीश बापट यांनी सलग पाचे वेळा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर त्यांना भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यावर विजय मिळवत ते खासदार झालेत. त्यांनंतर त्यांनी संसद गाठला. त्याआधी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते राजकारणात उतरले. त्यानंतर ते महानगरपालिकेत नगरसेवक झालेत.
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
दरम्यान, पुण्यातील राजकारणात गिरीश बापट यांचा आताही दबादबा राहिला आहे. पुण्यात भाजपला वाढवण्यामध्ये गिरीश बापटांचा मोठा हात आहे.त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यातच झाला. तळेगाव दाभाडेमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. त्यानंतर त्यांनी बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी मिळवत १९७३ झाली त्यांनी टेल्कोमध्ये कामगार म्हणून काम केले. त्यांनी आणीबाणीच्या काळात नाशिक येथील तुरूंगात तुरूंवास देखील सोसला आहे.
Read also
हेही वाचा…पुण्यातील राजकारणातल्या ‘किंग मेकर’ ची अखेर प्राणज्योत मालवली, खासदार गिरीश बापटाचं निधन
हेही वाचा…“बाळासाहेब ठाकरेंच्या सभेला मैदानं खाली होती, पण आता..”, तानाजी सावंतांचं विधान, राजकारण तापणार
हेही वाचा…“तर १६ आमदार अपात्र ठरल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल”, मोठ्या नेत्याचा दावा, निकालाची उत्सुकता शिगेला
हेही वाचा…पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन