पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांची सध्या प्रकृती गंभीर असून त्यांना दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट आजारी आहेत. आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी स्वंयसेवक संघ, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यातच अलिकडेच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते व्हिलचेअरवरून कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते.
हेही वाचा…“७२ कोटी रुपयांतून शिरसाठांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी जीवाभावाची बाई कोण?” रूपाली पाटलांचा सवाल
गेल्या अनेक दिवसापासून गिरीश बापट आजारी आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालवण्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. गिरीश बापट यांच्या प्रकृतीबाबत लवकरच रूग्णालयातून बुलेटीन काढण्यात येणार आहे.
हेही वाचा…चंद्रकांत पाटलांचा ते विधान, त्यावर कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर म्हणाले, “माझी आई..”
गिरीश बापट यांनी सलग पाचे वेळा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर त्यांना भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं. त्यांनी काॅंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यावर विजय मिळवत ते खासदार झालेत. त्यांनंतर त्यांनी संसद गाठला. त्याआधी त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते राजकारणात उतरले. त्यानंतर ते महानगरपालिकेत नगरसेवक झालेत.
हेही वाचा…“सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस आणि मी आमदारांच्या १५० बैठका घेतल्या,” आमदाराचा मोठा गोप्यस्फोट
दरम्यान, पुण्यातील राजकारणात गिरीश बापट यांचा आताही दबादबा राहिला आहे. पुण्यात भाजपला वाढवण्यामध्ये गिरीश बापटांचा मोठा हात आहे.त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यातच झाला. तळेगाव दाभाडेमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. त्यानंतर त्यांनी बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी मिळवत १९७३ झाली त्यांनी टेल्कोमध्ये कामगार म्हणून काम केले. त्यांनी आणीबाणीच्या काळात नाशिक येथील तुरूंगात तुरूंवास देखील सोसला आहे.
Read also
हेही वाचा…“एकही आरोप सिद्ध केल्यास आमदारकीचा राजीनामा देईन,” संजय शिरसाठांचं सुषमा अंधारे यांना आवाहन
हेही वाचा…हाजीर हो….! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून समन्स
हेही वाचा…“त्यांच्या मनात गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेले”, तानाजी सावतांच्या दाव्यावर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया
हेही वाचा…“डंके की चोट पे…!” गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षासाठी रद्द
हेही वाचा…“कसब्याचा पराभव हा पराभव नाही..आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच”, चंद्रकांत पाटील