नाशिक : भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट पदाची जबाबदारी दिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झालं. त्यानंतर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बारामती दौरा केला आणि शरद पवारांना आव्हान दिलं. आता चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी दौरा करीत आहेत. तसेच भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा मिळणार असल्याचा दावा देखील करताना ते दिसत आहेत. यातच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
“विरोधकांना कोंडीत पकडणारे तोंडावर चांगलेच आपटले”; रूपाली पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रंचड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळे या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. असं वक्तव्य बावनकुळ्यांनी नाशिक येथे केले. तसेच जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. असंही ते म्हणाले.
पेडणेकरांचा भाजपच्या आरोपांच्या बॉलवर षटकार..! एका झटक्यात भाजपला केलं चारी मुंड्या चीत
देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळाली. असंही ते म्हणाले. तसेच समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत दिवा लावणे हा आमचा हेतू आहे. पुढच्या दोन महिन्यात सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. रामदास तडस यांनी शरद पवार यांच्या सिस्टिमला हरवलं आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून चांगले काम होईल. असंही ते म्हणाले.
“सरकार, विरोधी पक्ष, याकडे राजकारणापलिकडे जाऊन बघा”; रोहित पवारांना चिंता
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून राज्यात भाजप विरूद्ध शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष बघायला मिळत आहे. अनेक राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. अलिकडेच बारामती लोकसभा मतदार संघावरून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
Read also
- “शिवसेना अन् संभाजी ब्रिगेड युती पहिली निवडणुक सोलापूरातून लढणार”
- “काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
- “फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारे
- “देवेंद्र फडणवीस खरे हिंदूचे नवे हिंदुह्दयसम्राट आहेत”; नितेश राणे
- “सत्तेची हवा डोक्यात गेली की अशी तोंडघशी पडायची वेळ येते”