मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, तसेहच २०२४च्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीने आपली पावले उचलली असून, जयंत पाटलांच्या यात्रेने, पक्षसंघटना आणि पक्षवाढीला हातभार लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
काल, लातूर जिल्हयातील भाजप आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी बोलताना, “तळागाळातले कार्यकर्ते जेव्हा पक्षात प्रवेश करतात, तेव्हा पक्षाला मनापासून आनंद होतो. निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कमी पडत होती. धुमाळ यांच्या पक्षप्रवेशाने ताकदीत भर पडली आहे,” असे मत त्यांनी मांडले.
आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
“आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, अनेक इतर पक्षातील कार्यकर्ते, लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. यातूनच हे स्पष्ट होत आहे, की जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. मुळातच पक्ष वाढवणे हे सोपे काम असते, पण आलेल्यांना योग्य सन्मान देणं, ही मोठी जबाबदारी असते. या पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल,” असं म्हणत त्यांनी इतर पक्षांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
काल, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, माजी सदस्य प्रविण सुरवसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अतुल पाटील, निलंगा येथील रहेमानिया तालीम संस्थेचे अध्यक्ष फारुख देशमुख, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे सदस्य अनिलकुमार देवंग्रे, देवणीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव म्हेत्रे, वंचितचे बालाजी लवे, सचिन दोडके, युसुफ सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ आदींनी जाहीर प्रवेश केला.
पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबासाहेब पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष डी. एन शेळके आदी उपस्थित होते.
Read Also :
- पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार – देवेंद्र फडणवीस
- प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, मात्र बायपास सर्जरी यशस्वी, रेखा ठाकूर यांची माहिती
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी
- मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी समिती समन्स पाठवणार!