पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) पुण्यात मेट्रो ट्रायलचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी मेट्रोची ट्रायल झाली, लवकरच मैत्रीचं उद्घाटन होईल, अशी प्रतिक्रिया दिली. यातून त्यांचा रोख काय होता हे येत्या दिवसात समोर येईलचं. यापुढे पुण्यात एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार असल्याचे फडवीसांनी सांगितले. तसेच नाशिकच्या धर्तीवर पुण्यात नियो मेट्रो आणता येईल का? याची चाचपणी करा, असाही सल्ला फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
राऊतांच्या चमकोगिरीचा आणि सामनाच्या संपादकाचा काय संबंध? याचा खुलासा द्यावा – चित्रा वाघ
पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन मेट्रो आल्या आहेत. पीपीई खाली एक सेवा सुरू करतोय. काही लोकांनी मेट्रो आणली तेव्हा होईल की नाही? असा प्रश्न केला होता. देशात दोनच मेट्रोने काम केलं त्यात एक नागपूर आणि दुसरे पुणे. आता एकाच तिकिटावर मेट्रो आणि बसने प्रवास करता येणार आहे. ट्रॅव्हल प्लॅन तयार केला जाणार आहे. १०० टक्के इंटिग्रेशन करता येईल. देशात सर्वाधिक टू व्हीलरची संख्या पुण्यात आहे. ४५ लाख टू व्हीलर पुणे शहरात आहेत.
सहकार क्षेत्रात केंद्राची ढवळाढवळ; मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणार?
राज्यात नाशिक मॉडेल होत आहे. तिथं नियो मेट्रो सुरु होत आहे. वाराणसीलासुद्धा हा प्रकल्प होतोय. मेट्रोच्या २५ टक्के रकमेत तो प्रकल्प होतो. दोन कॉरिडॉर एकत्र करून नियो करता येईल का याचा विचार करा. केंद्रसुद्धा याबाबत मदत करेल. त्याचप्रमाणे नाशिकच्या नियो मेट्रोच्या धर्तीवर पुण्यात नियो मेट्रो आणता येईल का? याची चाचपणी करा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना दिला. महाराष्ट्राच्या महामेट्रोलाच काम देता येईल का ते पण बघा. १० रुपयांत प्रवास सुरु केला, त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी कल्पकतेने बस सेवा सुरू केली. पुणे पालिकेने पुण्य नगरीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतलाय. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम करता सुलभता हवी, वेळेची खात्री हवी त्यासाठी डिजिटल अॅप लवकरच सुरू करणार असल्याचंही फडवणीस म्हणाले.
Read Also :
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी
- आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
- काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
- पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी