मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून टिका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर नाना पटोले यांनी भाजपवरही टिका केली आहे.
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
मागील २०१९ सालच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन असा जोरदार दावा केला होता. परंतु फडणवीस सत्तेवर आले नाहीत. फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी आहेत. शिवसेना फोडून ते पुन्हा सत्तेवर आले परंतु उपमुख्यमंत्री म्हणून. माझ्यासारखा असता तर उपमुख्यमंत्री घेतलेच नसते. यावरून फडणवीस यांची सत्तेची लालसा दिसून येते. अशी टिकाही नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
दरम्यान, सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात राज्यातील राजकीय नेते प्रचार करतांना दिसत आहेत. यातच पंढरपुर दौऱ्यावर आले असता नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर टिका केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष