मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आलं आहे. यातच आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल राज्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळवून देणार आहे. त्याआधी महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाकित भाजप आमदाराने वर्तवलं आहे.
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
संजय राऊतांच्या बैठका सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या संदर्भात रोज होत आहेत. तशी त्यांची बोलणीही सुरू असून संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की संजय राऊत यांची शरद पवाराच्या राजीनाम्याच्या वेळीची भूमिका पाहिली किंवा त्याआधीची भूमिका पाहा ते अजित पवारांवर सातत्याने टिका करत आहेत.
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेस करण्यासाठी त्यांची अटच अशी आहे की अजित पवारांनी पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो असं संजय राऊत यांनी शरद पवार यांना सागितलं आहे. असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. तसेच भाजपात आम्ही रूळलोय. कारण आम्ही १२ वर्ष काॅंग्रेसमध्ये असलो तरी काॅंग्रेसने आम्हाला कधीच स्विकारलं नाही. तिथे कायम आम्हाला राणे समर्थक मानलं जायचं. किंवा राणे हे वेगळेच आहेत. असं म्हटलं जायचं. तसचं वेगळं ठेवलं होतं. परंतु भाजपाने आम्हाला परिवार म्हणून स्विकारलं आहे. जवळ घेतलं आहे. त्यामुळे भाजपात काम करायला मजा येत असल्याचंही नितेश राणे यांनी आर्वजून सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”