पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचे एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.
उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर; ‘त्या’ वादावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न
दरम्यान, यावर आता काँग्रेसकडून विधान केले गेले असून, पृथ्वीराज चव्हाणांनी, “असे असेल तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करावे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. कॉँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनासाठी चव्हाण पुण्यात आले असताना, कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पांडुरंगाच्या महापूजेला येऊ नका, बंडातात्या कराडकरांची मुख्यमत्र्यांना हात जोडून विनंती
दरम्यान, याच विधानाचा संदर्भ घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून, “उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, हे पृथ्वीबाबांचं वक्तव्य स्तुतीपर होतं की…?, असा खोचक सवाल केला आहे.
तसेच, “असं विधान करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच केली,” असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. भाजपच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील बोलत होते.
Read Also :
- एकनाथ खडसेंना मोठा धक्का! जावयावर ईडीने केली मोठी कारवाई
- मोदींनी मन जिंकले : भर पावसात स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले
- का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
- फडणवीसांचा खुलासा, भाजप हा नक्की ‘कुणाचा’ पक्ष? देशात मोदींच्या नेतृत्वाखाली ‘कुणाचे’ राज्य आहे?
- मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, आशिष शेलार म्हणतात…