पुणे : अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्रमानिमित्ताने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. यांसंबंधी एका व्यक्तीने कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
“खैरे यांनीच आम्हाला भाजपकडून पैसे आणून दिले”; इम्तियाज जलील यांचा खैरेंना जोरदार टोला
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना अर्ध्या रस्त्यात पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी जेजूरीला जाऊन दुग्धिभिषेक केला होता. तसेच शरद पवार यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टिका केली होती.
न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
बहुजनांची पोरं आजा नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, तसेच हिंदू संस्कृती व मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागले होते. त्यामुळे या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना दिली. यळकोट यळकोट जय मल्हार, असंही म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
“गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
दरम्यान, शरद पवार यांनी पोलिसांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला तरी आम्ही चौंडीला जाणारच. चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर आहे काय ? पवारांचं राजकारण जेव्हा बहुजन पोरांना समजेल तेव्हा बहुजन पोरं आजोबा नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
Read also:
- “हवामान खात्याचाही पोपट झालाय का?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- “केंद्र सरकारने राज्याला 14 कोटी दिलेत, आता इंधनावरील दर कमी करावा”; भाजप नेत्याची मागणी
- “विलास लांडे यांनी कावेबाज लोकांना ओळखावे अन् पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावी”
- “मी जर एक सीडी चालवली तर महाराष्ट्र हादरेल”; करूणा शर्माच्या दाव्याने खळबळ
- “हिमालय संकटात होता, तेव्हा त्याच्या मदतीला ‘सह्याद्री’ धावून आला, तसेच काॅंग्रेसलाही..;” नाना पटोले