पंढरपूर : नांदेड देगलूर विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय होईल, असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज सांगोला येथे आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, बिलोली-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे.
तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याने कमावलेल्या उत्पन्नातून एसटी चालेल; नारायण राणेंचा अनिल परबांवर घणाघात
या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगली प्रचार यंत्रणा लावलेली आहे. तसेच स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे चांगल्या प्रकारे जुळवल्यामुळे काँग्रेस पक्ष हि जागा निश्चितपणे जिंकेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधी वर्ग करू नका, अन्यथा आत्मदहन करू; शिवसेना आमदाराचा इशारा
दरम्यान, राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असणाऱ्या आंदोलनाबाबत बोलताना थोरात म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन काही ठिकाणी सुरू आहे. शासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. पण, अजून काही विषय असतील तर मुंबईत गेल्यानंतर माहिती घेऊन यावर चर्चा करू असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :
- केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणे माझ्यासाठी महत्वाचे आहे – संजय राऊत
- विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँकेच्या चौकशीला हायकोर्टाचा हिरवा कंदील
- राष्ट्रवादीचे भोसरीतील ‘मॅनेजमेंट गुरू’ अजित गव्हाणे दुसऱ्यांदा ‘फेल’
- भाजपला मोठा धक्का: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणारे 10 नगरसेवक अपात्र!
- असं का? लै मस्ती आलीये वाटतं? उदयनराजेंनी थोपटले दंड