महाड : काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाड विधानसभा मतदार संघावरून काॅंग्रेस आणि ठाकरे गटात वाद बघायला मिळत आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरून आता नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी असं करायला नको होतं. असं म्हणत नाना पटोले यांनी स्नेहल जगताप यांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”
उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की, हे करू नका. तरी त्यांनी केलं आहे. यामुळे महाविकास आघाडीला कमजोर करण्याच काम होत असेल तर हे चुकीचं आहे. ज्यावेळी यावर चर्चा होईल. त्यावेळी आम्ही ती करू. ही जागा काॅंग्रेस पक्षाची आहे. अन् ती आम्ही लढू. असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
दरम्यान, पाच ते सहा महिन्यापुर्वी ठाकरे गटात येण्यासाठी स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पंरतु ठाकरे गटात जाऊ नये म्हणून काॅंग्रेसकडून त्यांना विनंती करण्यात आली. तरीही उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काॅंग्रेसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोण पार्सल ते फडणवीसांना निपाणीत सांगणार ? फडणवीसांच्या टिकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?