पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील राजकीय नेते महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात आपापल्या पक्षातील उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत साडेतीन जिल्हाचा पक्ष म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जहरी टिका केली. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
काल कर्नाटकात भाजप उमेदवार सुनील हेगडे याच्या प्रचारार्थ फडणवीसांनी राष्ट्रवादीवर जहरी टिका केली. ते म्हणाले की, संपुर्ण कर्नाटकात राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही. पंरतु याठिकाणी त्यांनी उमेदवार दिला आहे. साडेतीन जिल्हाचा पक्ष याठिकाणी काय करणार असून हे पार्सल तुम्ही महाराष्ट्रात पाठवून द्या. असा खोचक टोला फडणवीसांनी राष्ट्रवादीला लगावला. त्यावर शरद पवारांनी टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेवर शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लवकरच निपाणीत जाणार आहे. तसेच कोण पार्सल आहे ते लवकरच कळणार असून निकालानंतर सगळं समजेल. असं शरद पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ९ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. काल निपाणीत उत्तम रावसाहेब पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचार केला.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहण्यांपैकी, त्यांना सत्तेची लालसा”
हेही वाचा…“शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष पुढे नेईल, असा ‘वारसदार’ निर्माण करण्यात अपयशी”
हेही वाचा…मोठी बातमी..! “संजय राऊत १० जुनपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
हेही वाचा…“शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते”, जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…“राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे, ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल”