मुंबई : महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही नव्हती. राज्यात 1982 साली माझंही सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. त्यावेळी मला यासंदर्भात रात्री मुख्य सचिवांनी फोन करून सांगितलं की सरकार बरखास्त करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना बघण्यासाठी गेलो होतो. सरकार येतं सरकार जातं. परंतु मी कधीही अस्वस्थ झालो नाही. परंतु हल्ली काही लोकं सत्ता गेल्यानंतर खुप अस्वस्थ झाले आहेत. असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यावर त्यांनी आता शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
शरद पवारांच्या वक्वत्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, या अगोदर कोण काॅंग्रेस पक्षात गेलं. मग पुन्हा त्यातून बाहेर पडलं. हे येणं जाणं अस्वस्थेशिवाय होईल का? कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो. त्यामुळे काळजीचं कारण नाही. मी एकाच पक्षाच आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणार आहे. यावर माझा विश्वास आहे. मोहित कंबोज, किरीट सोमय्यांवर जे हल्ले करण्यात आले ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी लावला.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
ठोकशाहीने वागत असेल तर ठोकशाहीनेच उत्तर दिलं जाईल, केरळ बंगालमध्ये खुन झालेत, तरही आम्ही घाबरलो नाहीत. सरकारच्या या दडपशाही, गुंडाशाहीला आम्ही घाबरणारे नाहीत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष सुरू आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, राज्यात जर हनुमान चालिसा वाचणे जर राजद्रोहाचा गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा रोज करू, हनुमान चालिसा भारतात म्हणायला हवी, मग काय आम्ही पाकिस्तानात हनुमान चालिसा म्हणू का ? नवनीत राणा यांना तुरूंगात हिन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. त्यांचा थोडाफार विचार केला पाहिजे. त्यामुळे आम्हाला आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणालेत.
Read also:
- ” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
- किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
- “सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
- “मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
- राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;