छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार या शब्दावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना गॅलक्सी रूग्णालयात पोहचले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारचा जीआर त्यांच्या हाता दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी आता राज्य सरकारने पुर्ण केली आहे. यातच आज माझी खासदार संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
मनोज जरांगे पाटलांवर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या रूग्णालयात जाऊन आज संभाजी राजे यांनी भेट घेतली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना लागलीच दवाखान्यातून सुट्टी देण्यात येऊ नये. जरांगे पाटील यांनी उपचार घ्यावेत. असं संभाजी राजे यांनी डॉक्टरांना सांगितले.
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला
दरम्यान, नऊ दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल त्यांच्या यकृतावर सूज असल्याचे समोर आले होते. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारण दिसून येत आहे.
आज छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. अशक्तपणा असला तरी काळजीचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले. pic.twitter.com/25kkSWII2m
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदाराच्या गाडीचा मोठा अपघात, चारचाकी गाडीचा झाला चक्काचूर
हेही वाचा…अंबानींनकडून ४०० कोटींची खंडणी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, तेलंगणातून केली अटक
हेही वाचा…“कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते सर्व बाहेर काढेन ?” फडणवीसांनी कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका