मुंबई : इर्शालवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप अनेकजण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य सुरूच आहे. दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या काही मुलांनी त्यांचे आई-वडिल गमावले आहेत. अशा अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याचा निर्णय डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने घेतला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जाबबदारी फाऊंडेशनकडून घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षापासून १४-१५ वर्षांपर्यतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दु:ख सांत्वनापल्यात आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परिक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे.
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं
समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची उब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन ईर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“धीर धरा, काळजी घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव”, इर्शाळवाडी ग्रामस्थांचं उद्धव ठाकरेंनीं केलं सात्वंन
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार हे दोघं मिळून ‘एकनाथ शिंदें’चा करेक्ट कार्यक्रम करतील”
हेही वाचा…“मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की…,” मिटकरींच्या ट्विटमुळे कोणाची झोप उडाली ?
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”