मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असून ठिकठिकाणी शहाराच्या मध्यवर्ती भागात वाढदिवसाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागल्याने यावर खुप चर्चा केल्या जात आहेत. परंतु राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, मी अजित अनंत पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की,.. लवकरच अजितपर्व असंही मिटकरींनी म्हटलं आहे. तर याखाली ३० सेंकदाचा व्हिडीओ देखील मिटकरींनी ट्विट केला आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष
दरम्यान, मिटकरींनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार यांचे भाषण. तसेच अजितदादा यांना संघर्ष योद्धा, निडर नेतृत्व आणि करारी व्यक्तिमत्वही म्हटलं आहे. मिटकरींनी केलेल्या ट्विटमुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिंदेंच्या आमदारांना डिवचण्यात येत आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही” आदित्य ठाकरेंचा भाजपच्या आमदाराला टोला
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”