मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत मांडलं आहे.
हेही वाचा…“दरडीचा अंदाज येत नसेल तर मग ते कसंल प्रशासन?” राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप
अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील. भावी म्हणजे ते फार दिवश भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, अजित पवार यांच्या वाढदिवसाला असे काही बॅनर्स लागलेत की नाही, ते मला माहित नाही, मी काही ते पाहिलं नाही. परंतु ते लवकरच मुख्यमंत्री होतील हे सत्य आहे आणि सत्य आता शिंदे गटाने स्वीकारलं पाहिजे असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे.
हेही वाचा…राष्ट्रीय पातळीवर शरद पवारांना धक्का…! ‘या’ राज्यातील तब्बल ७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
दरम्यान, यातच काल अजित पवार गटाकडून अजित पवार यांचा वाढदिवस अजित उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांनी वाढदिवस साजरा न करता त्याचा सर्व खर्च ईर्शाळवाडी दुर्घटनेसाठी देण्याची सुचना केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष
हेही वाचा…“तुम्ही कोण, पात्रता काय, काय डोक्यावर पडल्यासारखे..”, अंबादास दानवेंनी भाजपच्या आमदाराची थेट इज्जतच काढली
हेही वाचा…ईडीकडून राऊतांच्या निकटवर्तींना पोलिस कोठडी..! सुजित पाटकर, सुरज चव्हाण नंतर नंबर कुणाचा ?
हेही वाचा…व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या दिल्लीत दाखल, अमित शहांची भेट घेणार ?