बुलढाणा : कापुस सोयाबीनसाठी २० नोव्हेंबरला बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना एल्गार मोर्चा काढला. त्यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईला धडक देऊन २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यातच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरून आता पुन्हा रविकांत तुपकर यांनी सरकारला कडक इशारा दिलाय.
हेही वाचा…“मुस्लिम महिलांचा संसार वाचवण्याचं काम मोदींनी केलं, त्यामुळे २०२४ ला मोदीच येणार”
रविकांत तुपकर यांना अटक करून जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तसेच हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत लढणार. शहिद झालो तरी चालेल. मात्र मागे हटणार नाही. यह तो अभी ट्रेलर है, असं म्हणत कायदा हातात घेऊन आंदोलन करू नका, असं आवाहनही कार्यकर्त्यांना त्यांनी केलं आहे.
हेही वाचा…शिंदेंचा गड ठाकरेंकडून उद्धवस्त, २५० पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात केला जाहीर प्रवेश
शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर २० नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर दिला होता. परंतु त्याआधीच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात असून कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला, भुजबळांची होणार ‘या’ ठिकाणी जंगी सभा, रॅलीचंही आयोजन
दरम्यान, रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. पोलीस स्टेशन समोरील झाडावर नितीन राजपूत हा कार्यकर्ता चढला. त्याने यावेळी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. परंतु पोलिसांनी वेळत त्याला खाली उतरवल्याने अपघात टळला. तर रविकांत तुपकर यांच्या पत्नी देखील पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन करीत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…दैवत म्हणून शरद पवार यांचा अपमान का करताय? जितेंद्र आव्हाडांनी सुनील तटकरेंना सुनावलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
हेही वाचा…भाजपचे खासदार आणि शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये जुंपली, पाणी प्रश्नावरून भाजपचा खासदार खासदारकीचा राजीनामा देणार ?
हेही वाचा…रविकांत तुपकरांना पोलिसांनी केली अटक, कार्यकर्ते आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…पंकजा मुंडेंवर खरंच अन्याय झाला आहे का ? शिंदे गटाच्या दाव्यानंतर भाजपकडून स्पष्टीकरण