IMPIMP
For Thackeray's march, youths from Jalanya entered Mumbai with torches, the march will start shortly For Thackeray's march, youths from Jalanya entered Mumbai with torches, the march will start shortly

ठाकरेंच्या मोर्चासाठी जालन्यातील युवक पेटती मशाल घेऊन मुंबई दाखल, मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरूवात

मुंबई : धारावी प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून आज अदानींच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे अदानी कार्यालयाजवळ जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून बीकेसीतील सेबी कार्यालयाजवळ उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईतील राजकीय वातावरण आज चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

अदानींच्या विरोधात ठाकरे गटाच्या मोर्चासाठी राज्यभरातून युवक मुंबईत दाखल झाले आहेत. यातच मराठवाड्यातील जालन्यातून पेटती मशाल घेऊन कार्यकर्ते धारावीत पोहचले आहेत. ठाकरे गटाच्या मोर्चा पाठिंबा देण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून युवक मुंबईत दाखल होत आहेत. तसेच धारावी परिसरात ठिकठिकाणी ठाकरे गटाने बॅनरबाजी केलेली आहे. यातच पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आढावा घेतला जात आहे. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश 

दरम्यान, धारावी टी जंक्शनपासून ते बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे. अदानींच्या कार्यालयावर आज ठाकरे गटाचा मोर्चा धडकणार आहे.

READ ALSO :

हेही वाचाहॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’ : ते आले…त्यांनी भेट दिली…जिंकून गेले सारे! खासदार अमोल कोल्हे यांना ‘राजकीय मायलेज’

हेही वाचा...राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल 

हेही वाचा…“बिनडोक, दुरदृष्टी नसलेला व्यक्तीच्या दबावापोटी लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का?” रोहित पवारांचा रोख कुणाकडे ? 

हेही वाचा…एैसा कैसा चलेगा टोमणेसम्राट??? धारावीच्या मोर्चावरून शिंदे गटाने ठाकरेंना डिवचलं

हेही वाचा“जागांची चिंता करू नका, लोकसभा अन् विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा ,” देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना