मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसानंतर राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टिका केली. महाराष्ट्रातून बाहेर गेलेले प्रकल्प प्रामुख्याने शेजारील राज्य गुजरातमध्ये गेल्याने विरोधकांनी शिंदेंना निशाण्यावर ठेवलं. यातच आता कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“आमची अवस्था दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांसारखी,” महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे काय बोलून गेले ?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ३ मार्च २०२३ रोजी तेलंगणा ने अप्पलची सर्वात मोठी पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन सोबत ३५००० कोटी रूपयांचा करार केल्याची घोषणा केली. या अन्वये फॉक्सकॉन तेलंगणात ३५०० कोटींची गुंतवणुक करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातून तेलंगणामध्ये तब्बल १ लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती तेलंगणा सरकारकडून देण्यात आली.
हेही वाचा…“सावरकर समझा क्या…”, भाजप अन् काॅंग्रेसमध्ये जुंपली, टिका टिप्पणीत ट्विटवार
यातच आता फॉक्सकॉन ने कर्नाटक सरकारसोबत देखील एक करार केला असून, तब्बल ८ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक ते कर्नाटकमध्ये करत आहेत. यातून देखील प्रत्यक्ष ५० हजार प्रत्यक्ष रोजगार तर अप्रत्यक्षरित्या १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. मागे महाराष्ट्रातून फॉक्सकॉन चा सेमीकंटक्टर निर्मिती प्रकल्प गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातला हलविण्यात आला. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर इथल्या युवकांना देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला असता. राज्यात युवकांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराची आवश्यकता आहे. अश्यावेळी आपल्या शेजारच्या राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असताना महाराष्ट्राच्या माथी मात्र “तुम्हाला यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहे” अशी आश्वासने मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून देण्यात येतात. मुख्यमंत्री देखील त्या खोट्या आश्वासनांना दागिण्या सारख मिरवत आपल्याच राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचंही आव्हाडांनी म्हटलं.
हेही वाचा…संपकरी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू, शिंदे सभागृहात घोषणा करणार? उद्यापासून कर्मचारी कामावर हजर
शेवटी एक निरीक्षण सांगतो. ज्या ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत,त्या त्या राज्यात Foxconn ची मोठी गुंतवणूक होत असल्याच्या बातम्या येतात.मागे गुजरातला निवडणूक होती, तिथं देखील Foxconn गुंतवणूक करणार असल्याच्या बातम्या आल्या आणि भाजपाला मोठं यश निवडणुकीत मिळालं. म्हणजेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मोठं मोठ्या गुंतवणूक त्या त्या राज्यात येत असल्याचं दाखवत आहे. आपल्या इथ मात्र त्यांना निवडणुका घेण्याची गरज नाही पडली.काही आमदारांच्या मागे “महाशक्ती” उभा राहीली आणि काम झालं.आता राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायला हवी असेल तर राज्यात निवडणुका व्हायला हव्यात.त्याशिवाय महाशक्ती “तुम्हाला यापेक्षा मोठा प्रकल्प देणार” नाहीये. असा टोलाही त्यांनी लगावला.
3 मार्च 2023 रोजी तेलंगणा ने ॲप्पल ची सर्वात मोठी पुरवठादार कंपनी Foxconn सोबत 3500 करोड रुपयांचा करार केल्याची घोषणा केली. याअन्वये Foxconn तेलंगणात 3500 कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती समोर येत आहे.यातून तेलंगणा मध्ये तब्बल 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील,अशी माहिती तेलंगणा… https://t.co/jUstk3LipP pic.twitter.com/hI8DBimIaj
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 21, 2023
Read also
- हेही वाचा…“नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्चला, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थितीत राहणार”
- हेही वाचा…“मागण्या मान्य करा, अन्यथा..,” शेतकऱ्यांनी सरकारला दिला ४० दिवसांचा अल्टिमेटम, राजकारण तापणार
- हेही वाचा…तयारीला लागा…! लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभेच्याही निवडणुकांचा धुराळा उडणार ?
- हेही वाचा…“सत्ता सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडाणी मेहुल चोक्सी, मोदी”, राऊतांची जहरी टिका
- हेही वाचा…“अमृता फडणवीसांना धमकी देणारा अटकेत”, आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,,