मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात ठाकरे गटाच्या तरूण कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकार टिका केली आहे. यातच राज्यात मुका घ्या, मुका घ्या असा सिनेमा सुरू असून आमच्या कार्यकर्त्यां का अटक केली आहे.? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
राज्यात सध्या व्हिडीओचं प्रकरण सुरू असून मुका घ्या, मुका घ्या, सिनेमा सुरू आहे. त्यासाठी दादा कोंडके हवे होते. त्यांचा एक सिनेमा खुप गाजला होता. त्या मुका घ्या, मुका घ्या, प्रकरणात शिवसेनेच्या नेत्यांना का अटक केली जात आहे? त्यांचा काहीही संबंध नसून हा पोलीस यंत्रणेला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. असं म्हणत त्यांना जाहीर कार्यक्रमात आम्ही सांगितलं का मुका घ्यायला असा टोलाही राऊतांनी शितल म्हात्रे यांना लगावला.
हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा ते अगोदर समोर येऊ द्या. मार्फिंगचा विषय नंतर येईल अन् तो व्हिडीओ मी देखील अजून पाहिलेला नाही. परंतु पोलिसांकडून असंख्य कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात असल्याचं मला त्यांच्या घरीहून फोन येत आहेत. तसेच आज आमच्या कार्यालयात देखील पोलिस आले असून हा काय प्रकार सुरू आहे. असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच संबंधित व्हिडीओ आमदाराच्या मुलांना शेअर केला आह. त्यांना अटक केली का ? तसेच तुमच्या गटातील अंतर्गत भांडणं असतील तर ते तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष करू नका. असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.
हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
दरम्यान, सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, मातोश्री या फेसबुक पेजवरून शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडीओ मोर्फे करून व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर तपास केला असता रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरूणालाही ताब्यात घेतलं आहे.
Read also
- हेही वाचा…राष्ट्रवादीच्या पवारांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, भाजपने केला मोठा गट काबीज
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंची आंतरराष्ट्रीय भरारी…! आदित्य ठाकरेंना २०२३ चा ‘यंग ग्लोबल लीडर अवार्ड’ जाहीर
- हेही वाचा…“मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्यापाट्या का खेळत आहे?” संपाबाबत उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
- हेही वाचा..जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी केलेल्या संपात तांबे पित्रा-पुत्राचा सहभाग , जनतेचे प्रचंड हाल
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम