मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात मुलाखत पार पडली. या कार्यक्रमाचे निवेदक सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांना अभिनय करण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी आपल्या स्टाईलने ‘एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेश बाबू’ ? हा डायलॉग बदलून एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू असा सादर केला. त्यांच्या या अभिनयाची व डायलॉग सादर करण्याच्या स्टाईलची चांगलीच चर्चा होत आहे. शिवाय त्यांनी या कार्यक्रमात कॉलेज लाईफ ते लव्ह लाईफ अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
निवेदक सुबोध भावे यांनी पंकजा मुंडे यांना कधी विरोधी पक्षातील नेत्यांना फोडलय का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, होय.. मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपात आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.
“उद्धव ठाकरेंनी 2019 ला पाठीत खंजीर खुपसलं, त्यांच्याच कर्माची ही फळ”
याबरोबरच पंकजा मुंडे यांना कुणी प्रपोज केलं आहे का? असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जयहिंद कॉलेजमध्ये शिकत असताना गोपिनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायला लोक घाबरायचे. नाही मला कोणी प्रपोज केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही. पण एकदा मैत्री झाली की झाली, मग काय ती कायम टिकली, असं पंकजी मुंडे म्हणाल्या.
“पंकजा मुंडेंवर सतत अन्याय होतोय, त्यांनी वरिष्ठांना भेटावे”; खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला
याबरोबरच पंकजा मुंडे यांना कुणी प्रपोज केलं आहे का? असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जयहिंद कॉलेजमध्ये शिकत असताना गोपिनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायला लोक घाबरायचे. नाही मला कोणी प्रपोज केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही. पण एकदा मैत्री झाली की झाली, मग काय ती कायम टिकली, असं पंकजी मुंडे म्हणाल्या.
Read also
- सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा फायदा; MIM चे 8 नगरसेवक राष्ट्रवादीत
- “चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
- “एक एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोध बाबू ;” अन् त्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा
- “75 वर्षात पहिल्यांदाच आपल्या देशाला स्वच्छ विचारांचे पंतप्रधान लाभले”; नवनीत राणा
- “इगो उद्धव ठाकरेंना नाहीतर देवेंद्र फडणवीसांना आहे”