मुंबई : राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी १४ वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात ? असं वक्तव्य राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केलेत. यानंतर पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
हेही वाचा…मंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
श्रीराम बाबत केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांनी आज खेद व्यक्त केला. त्यावरून चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर मोठी टिका केलीय. ‘चूक मान्य नाही, पण खेद व्यक्त करतो’, अशी भाषा करणाऱ्या हाड हाड ला खरोखरच उपरती झालीय का? चूक मान्य नाही, याचा अर्थ राम मांसाहारी होता, या आपल्या धादांत खोट्या विधानावर हाड हाड अजूनही ठाम आहे… हाड हाड च्या खाटिकखान्यात सश्रद्ध हिंदूंच्या भावनांवर सुरी चालवण्याचा आसुरी प्रकार सुरूच आहे.. ह्या काल्पनिक हाड हाड मटण शॅापमध्ये जबरदस्तीने हिंदू देवी-देवतांना ओढणाऱ्यांना आपण केलेल्या किळसवाण्या प्रकाराचा किती खेद वाटतोय, ते त्याच्या पत्रकार परिषदेतून दिसलं. पश्चातापाशिवाय खेद व्यक्त करणं म्हणजे मगरीने अश्रू ढाळण्यासारखं आहे. असा घणाघात चित्रा वाघ यांनी चढवला आहे.
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
दरम्यान, श्रीरामबाबत वक्तव्या केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे. पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामबाबत काही एतिहासिक पुरावे दिलेत. यातच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, परंतु भाजपची मंडळी कुठलाही अभ्यास न करता टिका करता, त्यांनी अगोदर अभ्यास करावा, असा पलटवार देखील आव्हाडांनी केलाय.
‘चूक मान्य नाही, पण खेद व्यक्त करतो’, अशी भाषा करणाऱ्या हाड हाड ला खरोखरच उपरती झालीय का? चूक मान्य नाही, याचा अर्थ राम मांसाहारी होता, या आपल्या धादांत खोट्या विधानावर हाड हाड अजूनही ठाम आहे…
हाड हाड च्या खाटिकखान्यात सश्रद्ध हिंदूंच्या भावनांवर सुरी चालवण्याचा आसुरी प्रकार…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 4, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल