मुंबई : माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केलं त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. मला फक्त वाईट वाटतं आहे ते ३५४ कलम. षडयंत्र माझ्या खुनाचंही रचलं गेलं होतं. ३५४ मला मनाला लागलं आहे. खोटं कलम लावून षडयंत्र केलं गेलं आहे. आज मी राजीनामा आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर ते बोलत होते.
“लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
अध्यक्ष शरद पवार यांना मी लिहिलं आहे. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण असेल तर मला राजकारणात पडायचं नाही. आज माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण चाललं आहे. माझ्या मुलीला आज तिच्या मैत्रिणीने विचारलं की तुझ्या वडिलांनी कुणाचा विनयभंग केला आहे का? हे किती भयंकर आहे. मला असल्या राजकारणात राहायचं नाही. असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
“72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
लोकप्रतिनीधींवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा. आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे. चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे असतात ही पण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यावी. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचंही अजित पवारांनी म्हटले.
“72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
दरम्यान, रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोरून वाट काढताना आव्हाडांनी एका महिलेला बाजूलं केलं. त्यानंतर आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटवर व्हिडीओ शेअर करत आव्हांडावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Read also
- “त्यांनी मला हात लावला, तेव्हा जी फिलिंग आली, ती…”; पीडित महिलेचा आव्हांडावर धक्कादायक आरोप
- “जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा दिला..!” जंयत पाटलांची माहिती
- “आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला”; अन् अजित पवार संतापले
- महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
- “शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे