पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 72 तासाच 2 खोटे गुन्हे दाखल केल्याने आता राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
मोठी बातमी…! जितेंद्र आव्हाडांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली
जितेंद्र आव्हाड यांच्यावर 24 तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधीवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महतत्वाचे विषय आहेत. त्याला बगल देण्याचे काम होते हे महाराष्ट्राला मारक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारचे आणखी एक अपयश..! सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता जर कोणी कायदा हाती घेतला, चुक केली, नियमाप्रमाणे वागले नाही तर जरूर कारवाई करावी, मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल तर याकडे जनतेने जागरूकतेने, पाहावे असं आवाहन देखील त्यांनी केले. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय..! बच्चू कडूंची 25 वर्षाच्या मागणीला यश
दरम्यान, मागील 72 तासात 2 खोटे गुन्हे दाखल झाले असून पोलीसी अत्याचाराविरूद्ध शेवटपर्यंत लढणार. मी माझ्या आमदारीकाच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीची हत्या. उघड्या डोळ्यांनी मी बघू शकत नाही. असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
Read also
- महिलांचा अपमान करणाऱ्यांना पदावरून हटवा..! राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
- “शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं”; चंद्रशेखर बावनकुळे
- “लोकशाहीचा खून करणारा इडी सरकार”; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली पाटलांचा हल्लाबोल
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय
- “72 तासाच 2 गुन्हे… आता आमदारीकाचाच राजीनामा देतो”; जितेंद्र आव्हाडांचा मोठा निर्णय