रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघात दोन सभा झाल्या. या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी बल्किस बानो यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टिका केली. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे.
हेही वाचा…“संजय गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे”, रूपाली पाटील आक्रमक
उद्धव ठाकरे आज काय बिल्किस बानो प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. पाकिस्तानातील मरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा. दहशतवादी संघटना जमात-उद-दावा आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदचा सहायक भुट्टावी याचा मृत्यू झाला त्याबद्दल श्रद्धांजली अर्पण करताय ? काल विकासाचा महासेतू खुला झाला त्यावर मळमळ, जळजळ व्यक्त करताय? अशी टिका आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल
तसेच उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच आहे. रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच. आम्ही सकाळीच म्हटले होते. रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकविताच दौरा करणार. आता रायगडमध्येच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का ? त्याचीही एकदा चौकशी करून बघून या . असा टोला देखील शेलारांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
दरम्यान, आशिष शेलार जी काही मोजक्या अभ्यासू नेत्यांपैकी आपल्याकडं पाहिलं जातं. परंतु तरीही अत्याचार झालेल्या एका स्त्रीला तुमच्यासारखा वकिल आणि मोठा नेता धर्माचं लेबल लावत असेल तर हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती? आज छत्रपती शिवराय असते तर अशा प्रवृत्तीला संपवण्यासाठी त्यांनी कडेलोट केला असता. असा इशारा रोहित पवारांनी शेलारांना दिला.
निषेध!
आशिष शेलार जी काही मोजक्या अभ्यासू नेत्यांपैकी आपल्याकडं पाहिलं जातं, परंतु तरीही अत्याचार झालेल्या एका स्त्रीला तुमच्यासारखा वकील आणि मोठा नेता धर्माचं लेबल लावत असेल तर हा तुमचा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती?आज छत्रपती शिवराय असते तर अशा प्रवृत्तीला संपवण्यासाठी… https://t.co/vT3FbXJhjW
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार उतरवणार ? फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली नड्डांची भेट
हेही वाचा…वंचितने ‘या’ सहा लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला, आघाडीचा आज ठरणार जागा वाटपाचा फॉर्म्युला
हेही वाचा…राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणुक जाहीर, राजकीय गणितं कसं असणार? कोण जिंकणार ?
हेही वाचा…नवनियुक्त पोलीस आयुक्त ‘अमितेश कुमार’ यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार
हेही वाचा…तुमची किळस येते शेलार, तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्चाताप होत असेल राष्ट्रवादीची जहरी टिका