IMPIMP

वंचित आघाडी-संभाजीराजे मेतकूट जमल्यास, शिवशाहीला नाही ‘पेशवाई’ला फटका

अमरावती : काल अकोला येथे पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याचे संकेत दिले आणि राजकीय वर्तुळात पुन्हा काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आज त्या अनुषंगाने पटोले यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी, ‘येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आले तर, त्याचा फटका शिवशाहीला बसण्यापेक्षा पेशवाईलाच जास्त बसेल बसेल,’ असं वक्तव्य केलं आहे.

नाना पटोले सध्या महामारीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि रुग्णालयांना भेट देण्यासाठी ते पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी, त्यांनी केंद्रावर देखील जोरदार हल्लबोल केला असून, उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असून देखील ते राज्याला देत नाहीयेत,’ असा आरोप केला आहे.

तसेच, बाहेर या इंजेक्शनचा काळाबाजार केला जातो. यामुळे अनेकांना प्राण, तर काहींनी आपले अवयव गमावले आहेत. मात्र, केंद्राला या सगळ्याशी काही घेणे देणे नाही,’ असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत आहे,’ असा घणाघात केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी काल अकोल्यात बोलताना, २०२४ मध्ये महाविकास आघाडी एक होऊन लढणार आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. यावेळी आंबेडकर आणि आणखी काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा होईल. मात्र, अजून तरी कुणाशी चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Also :